IPL 2023 Point Table: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून केला पराभव, ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती
दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स संघाचा नऊ गडी राखून पराभव केला.
आयपीएलच्या 48व्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. शुक्रवारी (5 मे) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सने त्यांचा नऊ गडी राखून पराभव केला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा संघ 17.5 षटकांत 118 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात गुजरातने 13.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 119 धावा करून सामना जिंकला. गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. त्याचा हा मोसमातील सातवा विजय आहे. त्यांचे आता 10 सामन्यांत 14 गुण झाले आहेत. गुजरातचा संघ केवळ तीन सामने हरला आहे. दुसरीकडे, या पराभवानंतर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. त्याचे 10 सामन्यांत 10 गुण आहेत. राजस्थानचे पाच विजय आणि पाच पराभव झाले आहेत.
ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती
IPL 2023 Points Table - If RCB and MI wins tomorrow, they'll enter the Top 4. pic.twitter.com/vEUVTCSFON
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2023 11:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

