Virat Kohli च्या चाहत्यांसाठी खुशखबर; 100 व्या कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षक क्षमतेला परवानगी

हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी प्रेक्षकांना हा सामना स्टेडीयममधून पाहण्याची परवानगी नव्हती. याबाबत प्रेक्षकांच्या सततच्या मागणीनंतर मंडळाने आता 50 टक्के प्रेक्षक क्षमतेला परवानगी दिली आहे. म्हणजेच हा सामना मैदानाच्या 50 टक्के लोक मैदानात उपस्थित राहून पाहू शकतील. या सामन्याची तिकिटे उद्या दुपारपासून ऑनलाइन उपलब्ध होतील. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजिंदर गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now