Rishabh Pant Health Update: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ऋषभ पंतला फ्रॅक्चर आणि अंतर्गत दुखापत नाही

घटनेनंतर काही वेळातच त्याला दिल्ली-डेहराडून रोडवरील सक्षम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी त्याला डेहराडूनला रेफर करण्यात आले.

Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

Rishabh Pant Health Update: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत शुक्रवारी सकाळी एका भीषण अपघाताला बळी पडला. 30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास त्यांची कार दिल्ली-डेहराडून महामार्गावरील दुभाजकावर आदळली आणि ती जळून खाक झाली. कसा तरी जीव वाचवून पंत गाडीतून बाहेर पडला. मात्र यादरम्यान पंत गंभीर जखमी झाला आहे घटनेनंतर काही वेळातच त्याला दिल्ली-डेहराडून रोडवरील सक्षम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी त्याला डेहराडूनला रेफर करण्यात आले. यावर आता त्याच्या दुखापतीवर माहिती मिळत आहे की पंतला फ्रॅक्चर नाही, अंतर्गत दुखापत नाही. तसेच त्याच्या आरोग्यासाठी सगळेजण प्रार्थना करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement