IND vs WI Series 2023: वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी, आता ते सर्व सामन्यांचा घेऊ शकणार विनामूल्य आनंद

या टूरचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण जिओ सिनेमावर केले जाईल. डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार संपादन करण्यासोबतच, जिओ सिनेमाने भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा देखील केली आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील दारूण पराभवानंतर टीम इंडियाला (Team India) आता जवळपास 1 महिन्याचा ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाला आपली पुढील आंतरराष्ट्रीय मालिका वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND vs WI) खेळायची आहे. 12 जुलैपासून टीम इंडिया यजमानांविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात करणार आहे. या टूरचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण जिओ सिनेमावर केले जाईल. डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार संपादन करण्यासोबतच, जिओ सिनेमाने (Jio Cinema) भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा देखील केली आहे. या संपूर्ण मालिकेदरम्यान जिओ सिनेमा हे सामने विनामूल्य प्रसारित करेल. याशिवाय, जिओचा ग्राहक नसला तरी चाहत्यांना सामना विनामूल्य पाहता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement