चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, IND vs BAN वॉर्म-अप सामना थिएटरमध्ये दाखवला जाईल

स्टार स्पोर्ट्सने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याची माहिती दिली आहे आणि असेही लिहिले आहे की आता चाहत्यांना भारतीय चित्रपटगृहांमध्येही हा सामना पाहता येणार आहे.

IND vs BAN (Photo Credit - Twitter)

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 च्या पूर्वी टीम इंडिया (Team India) आपला एकमेव सराव सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. 1 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8.30 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. या सराव सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. स्टार स्पोर्ट्सने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याची माहिती दिली आहे आणि असेही लिहिले आहे की आता चाहत्यांना भारतीय चित्रपटगृहांमध्येही हा सामना पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now