Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतबद्दल आनंदाची बातमी, कोणतीही गंभीर दुखापत नाही, 2 महिन्यांत मैदानात खेळताना दिसणार- DDCA
डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा म्हणाले की, आम्हाला आशा आहे की पंत 2 महिन्यांत मैदानात उतरेल, डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा ऋषभ पंतला भेटण्यासाठी डेहराडूनला पोहोचले होते.
Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी सकाळी एका भीषण अपघातात जखमी झाला. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. यानंतर पंतला डेहराडून येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा म्हणाले की, आम्हाला आशा आहे की पंत 2 महिन्यांत मैदानात उतरेल, डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा ऋषभ पंतला भेटण्यासाठी डेहराडूनला पोहोचले होते. बीसीसीआय ऋषभ पंतला सर्वोत्तम उपचार देत आहे. आतापर्यंत आलेल्या ऋषभ पंतच्या अहवालानुसार त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. आम्हाला आशा आहे की पंत 2 महिन्यांत मैदानात उतरेल. तसेच, डॉक्टरांच्या अहवालानुसार आम्ही पंतला दिल्लीला एअरलिफ्ट करू. प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. आम्ही ड्रायव्हर सुशील यांचाही सत्कार करू. असे त्यांनी सांगितले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)