Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतबद्दल आनंदाची बातमी, कोणतीही गंभीर दुखापत नाही, 2 महिन्यांत मैदानात खेळताना दिसणार- DDCA

डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा म्हणाले की, आम्हाला आशा आहे की पंत 2 महिन्यांत मैदानात उतरेल, डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा ऋषभ पंतला भेटण्यासाठी डेहराडूनला पोहोचले होते.

Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतबद्दल आनंदाची बातमी, कोणतीही गंभीर दुखापत नाही, 2 महिन्यांत मैदानात खेळताना दिसणार- DDCA
Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी सकाळी एका भीषण अपघातात जखमी झाला. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. यानंतर पंतला डेहराडून येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा म्हणाले की, आम्हाला आशा आहे की पंत 2 महिन्यांत मैदानात उतरेल, डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा ऋषभ पंतला भेटण्यासाठी डेहराडूनला पोहोचले होते. बीसीसीआय ऋषभ पंतला सर्वोत्तम उपचार देत आहे. आतापर्यंत आलेल्या ऋषभ पंतच्या अहवालानुसार त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. आम्हाला आशा आहे की पंत 2 महिन्यांत मैदानात उतरेल. तसेच, डॉक्टरांच्या अहवालानुसार आम्ही पंतला दिल्लीला एअरलिफ्ट करू. प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. आम्ही ड्रायव्हर सुशील यांचाही सत्कार करू. असे त्यांनी सांगितले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2022 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).