Neeraj Chopra Wins Gold Medal: गोल्डन बॉयची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी, नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा पटकावले आशियाई सुवर्णपदक

किशोरनेही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या दोन खेळाडूंच्या पदकांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता 80 वर पोहोचली आहे.

नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिक 2020 सुवर्णपदक (Photo Credit: PTI)

चीनमध्ये खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा 2023 च्या भालाफेक अंतिम सामन्यात भारताला दोन पदके मिळाली. या स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. भारताचा किशोर कुमार जेना रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. किशोरनेही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या दोन खेळाडूंच्या पदकांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता 80 वर पोहोचली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भालाफेक अंतिम फेरीच्या पहिल्या फेरीपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. या स्पर्धेत नीरजचा पहिला फेक तांत्रिक अडचणींमुळे मोजता आला नाही. त्यानंतर नीरजनने पुन्हा हा थ्रो घेतला आणि 82.38 चे अंतर कापले. याच स्पर्धेत भारताच्या किशोर कुमार जेनाने 81.26 मीटरची पहिली थ्रो फेकली. पहिल्या फेरीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याशिवाय दुसऱ्या फेरीत नीरजला 84.49 मीटर फेक करण्यात यश आले. जो त्याच्या पहिल्या थ्रोच्या खूप पुढे होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)