MCC Honors Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला मिळाला एमसीसीचा मान, सचिन तेंडुलकर झाला मेलबर्न क्रिकेट क्लबचा विशेष सदस्य

MCC ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एका महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला आहे.

Sachin Tendulkar (Photo Credit - X)

Sachin Tendulkar honoured with MCC Membership:  मेलबर्न क्रिकेट क्लबने (MCC) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान शुक्रवारी (27 डिसेंबर) भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरला सदस्यत्व देऊन सन्मानित केले. माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी मानद सदस्यत्व स्वीकारले आणि एमसीसीच्या यादीतील ताजे नाव आहे. MCC ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एका महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला आहे. MCC ने हे जाहीर करताना आनंद होत आहे की, माजी भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकरने खेळातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन मानद क्रिकेट सदस्यत्व स्वीकारले आहे." तुम्ही खालील पोस्ट पाहू शकता.

मेलबर्न क्रिकेट क्लबने सचिन तेंडुलकरला मानद सदस्यत्व देऊन गौरविले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)