Gautam Gambhir ने पदभार स्वीकारला, Team India ने नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली सराव केला सुरू; पाहा व्हिडिओ

भारतीय संघ 22 जुलैच्या रात्री कोलंबोला पोहोचला आणि कोणताही ब्रेक न घेता तयारीला सुरुवात केली.

Team India Practice (Photo Credit - X)

Indian Cricket Team Training Session: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आपले नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या देखरेखीखाली पहिले सराव सत्र सुरू केले आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे आणि तिथे पाहुण्या संघाला तीन सामन्यांची टी-20 आणि तितकीच एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारतीय संघ 22 जुलैच्या रात्री कोलंबोला पोहोचला आणि कोणताही ब्रेक न घेता तयारीला सुरुवात केली. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर आणि टी-20 कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) यांची ही पहिलीच मालिका आहे. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर गंभीरने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली असून त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिले प्रशिक्षण सत्र सुरू केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)