PBKS vs DC, IPL 2024 2nd Match Live Score Update: पंजाबला 100 धावावर चौथा धक्का, जितेश शर्मा 9 धावा करुन बाद

प्रथम फलंदांजी करताना दिल्लीने पंजाबसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी स्टार फलंदाज शाई होपने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली.

PBKS vs DC, IPL 2024 2nd Match Live Score Update: पंजाबला 100 धावावर चौथा धक्का, जितेश शर्मा 9 धावा करुन बाद
कुलदीप यादव (Photo Credit: PTI)

PBKS vs DC, IPL 2nd Match: आज आयपीएलमध्ये डबल हेडर आहे. आयपीएल 2024 चा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PK vs DC) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे खेळवला जात आहे. पंजाब संघाचे हे नवे घरचे मैदान आहे ज्यावर संघ खेळणार आहे. यापूर्वी मोहाली हे पंजाब संघाचे होम ग्राउंड होते. या सामन्यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत तब्बल 15 महिन्यांनंतर मैदानात परतत आहे. दरम्यान, पंंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना दिल्लीने पंजाबसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी स्टार फलंदाज शाई होपने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला दुसरा धक्का लागला आहे. पंजाबचा स्कोर 100/4

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 06:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).