Australia Central Contract: जोश इंग्लिस याला ऑस्ट्रेलियाचा केंद्रीय करार; माजी कसोटी कर्णधार टिम पेन, Jhye Richardson यांना वगळले; पहा संपूर्ण यादी

कसोटी संघाचा माजी कर्णधार टिम पेन आणि झे रिचर्डसन यांना वगळले असून जोस इंग्लिस याचा समावेश करण्यात आला आहे. वगळण्यात आलेल्या इतरांमध्ये अष्टपैलू मॉइसेस हेन्रिक्स, फलंदाज बेन मॅकडरमॉट आणि गोलंदाज केन रिचर्डसन यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन (Tim Paine) याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Cricket Australia) केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे, तर 2022-23 साठी डायनॅमिक यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस (Josh Inglis) याचा समावेश करण्यात आला आहे. तर मिचेल मार्श, स्कॉट बोलँड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल स्वेपसन या सर्वांनी गेल्या हंगामात करारात सुधारणा करून आपली जागा कायम ठेवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)