IND vs SL, Asia Cup 2023 Final Live Update: पहिल्याच षटकात श्रीलंकेला पहिला धक्का, बुमराहने परेराला केले बाद

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला पहिला धक्का लागला आहे.

Jasprit Bumrah (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना (Asia Cup Final 2023) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर (Colombo R Premadasa Stadium) खेळला जात आहे. दोन्ही संघांचे लक्ष जेतेपदाकडे लागले आहे. यजमानपदाचा लाभ श्रीलंकेच्या संघाला मिळणार आहे. सुपर 4 मध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना हरला होता. टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येकी एकच सामना गमावला आहे. आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला पहिला धक्का लागला आहे. श्रीलंकेचा स्कोर 5/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement