Sachin Tendulkar Deepfake Video: सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओ प्रकरणी अॅपच्या मालकावर FIR दाखल
सचिन तेंडुलकरचा स्वीय सहाय्यक रमेश पारडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर नोंदवला आहे.
Sachin Tendulkar Deepfake Video: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) गेमिंग वेबसाइट आणि फेसबुक पेजविरोधात एफआयआर नोंदवला आहे. सचिन तेंडुलकरचा स्वीय सहाय्यक रमेश पारडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर नोंदवला आहे. सोमवारी, दिग्गज भारतीय फलंदाजाने अॅपचा प्रचार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या स्वतःच्या बनावट व्हिडिओपासून सर्वांना सावध केले. व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरच्या व्हिडिओ आणि व्हॉईसमध्ये फेरफार करून तेंडुलकर अॅपची जाहिरात करत असल्याचा आवाज काढण्यात आला आहे. (हेही वाचा - Sachin Tendulkar Deepfake Video: सचिन तेंडुलकरचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, अशा व्हिडिओना रिपोर्ट करण्याचे मास्टर ब्लास्टरचे आवाहन)
Sachin Tendulkar Deepfake Video Probe: FIR registered against the app owner.
The cyber cell of Mumbai Police has registered an FIR after the complaint of Sachin Tendulkar's personal assistant, Ramesh Parde. IPC Section 500 and Section 56 of IT act...:@shwetaa_verma with details. pic.twitter.com/qzoPUsTqMz
— TIMES NOW (@TimesNow) January 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2024 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

