Spain vs Croatia, 3rd Match Euro Cup 2024 Live Streaming In India: युरो चषक स्पर्धेत आज स्पेन आणि क्रोएशिया यांच्यात होणार रोमांचक लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
आज स्पेन आणि क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 पासून खेळवला जाईल. स्पेन आणि क्रोएशिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये 10 सामने खेळले गेले.
Euro Cup 2024 Live Streaming In India: युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपची 17 वी (Euro Cup 2024) आवृत्ती सुरू झाली आहे. जर्मनीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. यावेळी 24 संघ युरो कप 2024 मध्ये सहभागी होणार आहेत. आज स्पेन आणि क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 पासून खेळवला जाईल. स्पेन आणि क्रोएशिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये 10 सामने खेळले गेले. या कालावधीत स्पेनने 6 सामने जिंकले आहेत, तर क्रोएशियाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. भारतीय चाहते युरो कप 2024 चे सामने सोनी स्पोर्ट्स टेन 2, सोनी स्पोर्ट्स टेन 2 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 3, सोनी स्पोर्ट्स टेन 3 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 4, सोनी स्पोर्ट्स टेन 4 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 5, वर थेट प्रक्षेपण पाहू शकतात. सोनी स्पोर्ट्स तुम्ही ते टेन 5 एचडी चॅनेलरवर पाहू शकता. याशिवाय या सर्व सामन्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाईव्ह ॲपवर केले जाईल.
Euro Cup 2024 kicks off tonight! Check out the thrilling match day 1 schedule!#ProSports | #euro2024 | #EuroCup | #Sports | #Football pic.twitter.com/W72fEsBVVb
— ProSports (@Pro_SportsPK) June 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2024 09:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

