FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी इराण फुटबॉल संघाच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; हिजाब विरोधी निदर्शनांना पाठिंबा (Watch Video)
इराणच्या खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला आहे.
फिफा विश्वचषक 2022 सुरु होण्याआधी तो वादांच्या भोवऱ्यात सापडला होता आणि आता स्पर्धा सुरू झाल्यानंतरही अनेक नवीन वाद समोर येत आहेत. इराणच्या खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला आहे. संपूर्ण इराण संघाने देशाच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना पाठिंबा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. इराण फुटबॉल संघाचा कर्णधार अलिरेझा जहांबख्श याने सामन्यापूर्वी सांगितले होते की, संघाचे सर्व खेळाडू सरकारविरोधी निदर्शनांच्या समर्थनार्थ राष्ट्रगीत गाण्यास नकार देतील की नाही हे एकत्रितपणे ठरवतील. त्यानंतर या सामन्यापूर्वी इराणचे राष्ट्रगीत वाजले तेव्हा खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये इराणचे 11 खेळाडू फक्त गंभीर मुद्रेत उभे होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)