'दिशा पटानीला अनुष्का शर्माची सर नाही'; IPL 2025 च्या उद्घाटन समारंभात Disha Patani चा डान्स परफॉर्मन्स पाहिल्यानंतर चाहत्यांची प्रतिक्रीया (Watch Video)
आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभात दिशा पटानीच्या परफॉर्मन्सवर काहींनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी आयपीएल 2015 च्या उद्घाटन समारंभातील अनुष्का शर्माचा परफॉर्मन्स आणि दिशा पटानीच्या परफॉर्मन्सला कंपेअर केले त्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिल्यात.

IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझन 18 ची सुरुवात भव्य उद्घाटन समारंभाने झाली. ज्यामध्ये श्रेया घोषाल, करण औजला आणि दिशा पटानी (Disha Patani) सारख्या कलाकारांनी ईडन गार्डन येथे कलेचे सादरीकरण केले. केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यातील आयपीएल 2025 च्या सामन्याआधी उद्घाटन समारंभात कलाकारांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कोलकातामध्ये झालेल्य या भव्य उद्घाटन समारंभात दिशा पटानीने देखील परफॉर्मन्स केला. ती तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेकांना तिचा परफॉर्मन्स आवडला नाही. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रीया दिल्या. दिशापेक्षा अनुष्का शर्मा (Anushka Sharma) कधीही चांगली असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अनुष्काने आयपीएल 2015 च्या उद्घाटन समारंभात सादरीकरण केले होते. त्यानंतर अनुष्काने आयपीएल 2015 च्या उद्घाटन समारंभातील परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दिशा पटानीचा परफॉर्मन्स
अनुष्काचे आयपीएल 2015 च्या उद्घाटन समारंभातील सादरीकरण
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)