Kaviya Maran: दक्षिण आफ्रिकेतही सनरायझर्सची मालकीण काव्या मारन चर्चेत, लाईव्ह मॅचमध्ये गड्यांन घातली लग्नाची मागणी (Watch Video)
आयपीएल लिलावादरम्यानही ती आकर्षणाचे केंद्र आहे, परंतु यावेळी ती भारताबाहेरही चर्चेत आहे.
सनरायझर्सची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) तिच्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते, ती जेव्हाही आयपीएल दरम्यान मॅच बघायला येते तेव्हा कॅमेरा तिच्याकडेच फिरतो. आयपीएल लिलावादरम्यानही ती आकर्षणाचे केंद्र आहे, परंतु यावेळी भारताबाहेर, दक्षिण आफ्रिकेतील SA20 च्या पहिल्या सत्रात, तिच्या संघाच्या सनरायझर्स इस्टर्न कॅपच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले होते जेव्हा एका प्रेक्षकाने काव्या मारनला लाईव्ह मॅचमध्ये लग्नाची मागणी घातली. त्याने कार्डबोर्ड वर "Kavya Maran Will You Marry Me" असे लिहिले होत आणि त्यानंतर त्याच्यावर कॅमेरामनची नजर गेली. त्यानंतर त्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)