IND vs SL: श्रीलंकेच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री, असिथा फर्नांडो भारताविरुद्ध खेळणार
तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. चमीराला दुखापत असूनही संघात स्थान मिळाले. पण सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे. आता फर्नांडोला त्याची जागा मिळाली आहे.
मुंबई: भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी श्रीलंकेने संघात बदल केले आहेत. संघाचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा (Dushmantha Chameera) दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत असिथा फर्नांडोला संधी देण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. उजव्या हाताचा मीडिया फास्ट बॉलर फर्नांडोने (Asitha Fernando) देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच त्याने श्रीलंकेसाठी 3 टी-20 सामनेही खेळले आहेत. गेल्या महिन्यात श्रीलंका प्रीमियर लीगदरम्यान चमीराला दुखापत झाली होती. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. चमीराला दुखापत असूनही संघात स्थान मिळाले. पण सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे. आता फर्नांडोला त्याची जागा मिळाली आहे. फर्नांडो भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार आहे.
पाहा ट्विट