Virender Sehwag On England Cricket Team: पर्सनल शेफसोबत इंग्लिश टीम येणार भारतात, सेहवागच्या ट्वीटने इंग्लंड संघाचा घेतला चांगला समाचार

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. याआधीच्या बातम्या समोर आल्या होत्या की इंग्लंडचा संघ स्वतःचा शेफही भारतात आणत आहे. यानंतर भारताच्या या माजी सलामीवीराने संघाची खरडपट्टी काढली आहे.

Virender Sehwag Trolls England Cricket Team: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) इंग्लंड संघावर खरपूस समाचार घेतला आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. याआधीच्या बातम्या समोर आल्या होत्या की इंग्लंडचा संघ स्वतःचा शेफही भारतात आणत आहे. यानंतर भारताच्या या माजी सलामीवीराने संघाची खरडपट्टी काढली आहे. शुक्रवारी 'द टेलिग्राफ' मधील एका वृत्तात म्हटले आहे की, इंग्लंड त्याच्या भारत दौऱ्यावर त्याच्यासोबत स्वतःचा शेफ देखील आणेल. यामागे खेळाडूंना आजारी पडण्यापासून वाचवण्याचे कारण देण्यात आले आहे. भारताच्या या माजी फलंदाजाने इंग्लिश संघावर ताशेरे ओढले असून आयपीएलदरम्यान त्यांना शेफची गरज भासणार नाही, असे म्हटले आहे.
ट्विटरवर ट्विट करताना सेहवागने अॅलिस्टर कुकचा उल्लेख केला, जो भारतात कसोटी मालिका जिंकणारा इंग्लंडचा शेवटचा कर्णधार होता. त्याने लिहिले की, “ही गरज कुक गेल्यानंतर निर्माण झाली, ती आयपीएलमध्ये निर्माण होणार नाही.”

पाहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement