ENG vs PAK 1st Test: इंग्लिश फलंदाजाने केली पाकिस्तानची धुलाई; 6 चेंडूत सलग 6 चौकार, कसोटीत टी-20 ची मजा (Watch Video)
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा इंग्लंड संघ जगातील पहिला संघ ठरला आहे. या दरम्यान, हॅरी ब्रूकचे धडाकेबाज शतक आणि सौद शकीलची धुलाई हे त्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक होते. ब्रूकने 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
ENG vs PAK: बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील (IND vs PAK) पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी 500 हून अधिक धावा करत विश्वविक्रम केला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा इंग्लंड संघ जगातील पहिला संघ ठरला आहे. या दरम्यान, हॅरी ब्रूकचे (Harry Brook) धडाकेबाज शतक आणि सौद शकीलची धुलाई हे त्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक होते. ब्रूकने 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर पुढच्या 12 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 34 धावा फटकावल्या. यातून ब्रूकने डावखुरा फिरकीपटू सौद शकीलच्याच षटकात 6 चेंडूत सलग 6 चौकार ठोकले.
पहा व्हिडीओ
Six fours in an over for Harry Brook to Saud Shakeel 🔥🙌🏻#PAKvENG #PAKvsEng #PakistanCricket
— Cricket.Social (@_cricketsocial) December 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2022 09:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

