David Willey Retirement: इंग्लंडच्या डेव्हिड विलीने विश्वचषकादरम्यान केली निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावरद्वारे भावना केल्या व्यक्त

डेव्हिड विलीने (David Willey) बुधवारी (1 नोव्हेंबर) सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आणि म्हटले की, भारतात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही.

David Willey Retirement: इंग्लंडच्या डेव्हिड विलीने विश्वचषकादरम्यान केली निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावरद्वारे भावना केल्या व्यक्त

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डेव्हिड विलीने (David Willey) बुधवारी (1 नोव्हेंबर) सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आणि म्हटले की, भारतात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. 'हा दिवस यावा असे मला कधीच वाटले नाही, लहानपणापासून माझे नेहमीच एकच स्वप्न होते - इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्याचे," विलीने X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. खूप विचार केल्यानंतर, "मला अत्यंत दुःखाने हे जाहीर करावे लागते की या विश्वचषकाच्या शेवटी, माझ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे." (हे देखील वाचा: ICC Best fielding Impact: मिचेल सँटनर विराट कोहलीच्या पुढे, आयसीसीने दिला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा दर्जा; पाहा रेंटिग)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2023 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).