ENG vs PAK ICC World Cup 2023 Toss Update: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जवळपास अशक्यप्राय कामगिरी करावी लागणार आहे.

ENG vs PAK ICC World Cup 2023 Toss Update: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

आयसीसी विश्वचषक 2023च्या 44व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात आज (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर आमनेसामने आहेत. हा सामन्याला 2 वाजता सुरुवात होइल. इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जवळपास अशक्यप्राय कामगिरी करावी लागणार आहे. या विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंडने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत, तर पाकिस्तानने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. दरम्यान, इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार / विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2023 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).