England Won The T20 WC 2022: टी-20 विश्वचषक जिंकून इंग्लंडने रचला इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक दोन्ही जिंकणारा इंग्लंड आता जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ बनला आहे.

Team ENG

टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (ENG vs PAK) 5 विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला आहे. या विजयासह इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक दोन्ही जिंकणारा इंग्लंड आता जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ बनला आहे. इंग्लंडने यापूर्वी घरच्या मैदानावर 2019 चा विश्वचषक जिंकला होता. हे दोन्ही जेतेपद सध्या इंग्लिश संघाकडे आहे. यापूर्वी कोणत्याही संघाला हे करता आलेले नाही. या विजयासह जोस बटलरच्या संघाने वेस्ट इंडिजचीही बरोबरी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)