IND vs ENG 1st Test 2025 Toss Update: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली, भारत प्रथम फलंदाजी करणार; साई सुदर्शनचे पदार्पण

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs ENG 1st Test 2025 Toss Update: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली, भारत प्रथम फलंदाजी करणार; साई सुदर्शनचे पदार्पण
IND vs ENG (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही करणार आहेत. पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून साई सुदर्शन पदार्पण करणार आहेत.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).