ENG vs SL 1st Test 2024 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसी इंग्लडचा संघ 358 धावांवर बाद, जेमी स्मिथची 111 धावांची शानदार खेळी; तर असिथा फर्नांडोने घेतल्या चार विकेट
आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 358 धावांवर आटोपला असुन 122 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून जेमी स्मिथने 111 धावांची शानदार खेळी केली. तर श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहे.
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 358 धावांवर आटोपला असुन 122 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून जेमी स्मिथने 111 धावांची शानदार खेळी केली. तर श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहे. आता दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्याआधी, श्रीलंकेचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून कर्णधार धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक 74 धावा केल्या. याशिवाय मिलन प्रियनाथ रथनायकेने 72 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर यांनी 3-3 बळी घेतले. तर गुस ऍटकिन्सन आणि मार्क वुडने एक विकेट घेतली.
A good morning's work for England with Jamie Smith's first Test hundred guiding them to a healthy first-innings lead 💪https://t.co/1E7nBMfnMe | #ENGvSL pic.twitter.com/jw0ECHzBCz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 05:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

