ENG vs NZ Test 2021: इंग्लंडच्या लज्जास्पद पराभवावर Kevin Pietersen चे मोठे विधान, फ्रँचायझी क्रिकेटवर फोडले पराभवाचे खापर

न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात 8 विकेटने इंग्लंडच्या पराभवानंतर इंग्लिश संघाचे माजी कर्णधार केविन पीटरसनने कसोटी क्रिकेटमधील संघाच्या फलंदाजी संकटांचे कारण स्पष्ट केले आहे. पीटरसनने इंग्लंडच्या कसोटी संकटांसाठी फ्रॅन्चायझी क्रिकेटला जबाबदार धरले आहे आणि इंग्लंड संघातील किती खेळाडू आज काऊन्टीच्या पूर्ण हंगामात खेळत नाहीत याकडे लक्ष वेधले.

केविन पीटरसन (Photo Credit: Instagram)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसर्‍या कसोटी सामन्यात 8 विकेटने इंग्लंडच्या (England) पराभवानंतर इंग्लिश संघाचे माजी कर्णधार केविन पीटरसनने (Kevin Pietersen) कसोटी क्रिकेटमधील संघाच्या फलंदाजी संकटांचे कारण स्पष्ट केले आहे. पीटरसनने इंग्लंडच्या कसोटी संकटांसाठी फ्रॅन्चायझी क्रिकेटला जबाबदार धरले आहे आणि इंग्लंड संघातील किती खेळाडू आज काऊन्टीच्या पूर्ण हंगामात खेळत नाहीत याकडे लक्ष वेधले. “फ्रँचायझी टी-20 सुरू झाल्यापासून, GREATS ने आजपर्यंत काउंटी क्रिकेटचा संपूर्ण हंगाम खेळलेला नाही. काउंटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यात प्रचंड अंतर आहे, त्यामुळे कसोटी सामन्यातील फलंदाजीचा त्रास होईल,” पीटरसनने ट्विटमध्ये लिहिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement