IND vs NZ 3rd T20 Live Score Update: न्यूझीलंडची लाजिरवाणी सुरुवात, 21 धावांवर निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, उमरान मलिकने घेतली विकेट
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद 126 धावा केल्या.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद 126 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 20 षटकात 235 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाला पाचवा मोठा झटका बसला. मायकेल ब्रेसवेल 8 धावा करून उमरान मलिकचा बळी ठरला. न्यूझीलंडचा स्कोर 21/5.