ENG vs SL 1st Test 2024 Day 3 Live Streaming: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, येथे पाहू शकता लाइव्ह

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. यासह यजमान संघाने 23 धावांची आघाडीही मिळवली आहे. इंग्लंडकडून युवा फलंदाज जेमी स्मिथ नाबाद 72 धावा करुन क्रिजवर आहे. याशिवाय गस ॲटकिन्सनही 4 धावा करून नाबाद आहे.

ENG vs SL 1st Test 2024 Day 3 Live Streaming: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, येथे पाहू शकता लाइव्ह
Photo Credit - X

England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. यासह यजमान संघाने 23 धावांची आघाडीही मिळवली आहे. इंग्लंडकडून युवा फलंदाज जेमी स्मिथ नाबाद 72 धावा करुन क्रिजवर आहे. याशिवाय गस ॲटकिन्सनही 4 धावा करून नाबाद आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठण्यात मदत करण्याची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवर असेल. दरम्यान, हा कसोटी सामना भारतातील टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय सोनीलिव्ह आणि फॅनकोड ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 03:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).