IPL Auction 2025 Live

Disney Star ने 2027 पर्यंत भारतात ICC मीडिया अधिकार मिळवले

2027 च्या अखेरीस पुरुष आणि महिलांच्या जागतिक कार्यक्रमांचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार प्राप्त केले आहेत.

Photo Credit - File Photo

डिस्ने स्टारने (Disney Star) 2024 ते 2027 या चार वर्षांच्या कालावधीसाठी भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) स्पर्धांचे प्रसारण करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. शनिवारी ही माहिती देताना आयसीसीने सांगितले की, डिस्ने स्टार पुढील चार वर्षांसाठी भारतातील सर्व आयसीसी सामन्यांचे प्रसारण करेल. 2027 च्या अखेरीस पुरुष आणि महिलांच्या जागतिक कार्यक्रमांचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार प्राप्त केले आहेत.  आयसीसीने म्हटले की, सीलबंद बोली प्रक्रियेच्या एकाच फेरीनंतर डिस्ने स्टार जिंकले. मागील चक्रात मीडिया अधिकारांसाठी खर्च केलेल्या रकमेपेक्षा ही लक्षणीय वाढ झाली आहे. यावरून क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि पोहोच दिसून येते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)