Video: नवी कार घेऊन रात्री उशिरा धोनी रांचीच्या रस्त्यावर निघाला; या 2 खेळाडूंनाही घेवुन गेला फिरायला, पहा व्हिडीओ

अलीकडेच धोनीने Kia चे नवीन EV6 गाडी विकत घेतली आहे, जी पाच सीटर इलेक्ट्रिक SUV कार आहे. त्याची किंमत 59.95 ते 64.95 लाख रुपये आहे. या गाडीतून तो फिरायला बाहेर निघाला.

Happy Birthday MS Dhoni (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) वाहनांची खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक सुपर-बाईक, व्हिंटेज आणि लक्झरी कार देखील आहेत, ज्यांच्यासोबत तो वेळोवेळी फिरायलाही जातो. अलीकडेच धोनीने Kia चे नवीन EV6 गाडी विकत घेतली आहे, जी पाच सीटर इलेक्ट्रिक SUV कार आहे. त्याची किंमत 59.95 ते 64.95 लाख रुपये आहे. या गाडीतून तो फिरायला बाहेर निघाला. याचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रांचीचा आहे. धोनी त्याच्या चेन्नई सुपर किंग्जचे सहकारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि केदार जाधव (Kedar Jadhav) यांच्यासह त्याच्या नवीन कारमध्ये फिरायला गेला. धोनी आता आयपीएलच्या पुढील मोसमात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now