Devdutt Padikkal Catch Video: देवदत्त पडिक्कलने इराणी चषकात हवेत उडी मारत पृथ्वी शॉचा घेतला झेल, दाखवली बिबट्यासारखी चपळाई

पृथ्वी शॉ कव्हरच्या दिशेने शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता आणि चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. देवदत्त पडिक्कलने बिबट्यासारखी चपळाई दाखवत शानदार झेळ घेतला.

Photo Credit - X

Irani Cup 2024: इराणी चषक 2024 चा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळला जात आहे. या लाल चेंडूच्या खेळात रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) अप्रतिम झेल घेत संघाला पहिले यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देवदत्त पडिक्कलने हवेत उडी मारत स्लिपमध्ये झेल घेत मुंबई संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉला स्वस्तात बाद केले. पृथ्वी शॉ कव्हरच्या दिशेने शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता आणि चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. देवदत्त पडिक्कलने बिबट्यासारखी चपळाई दाखवत शानदार झेळ घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement