RCB vs DC, IPL 2023 Match 20 Live Score Update: दिल्ली कॅपिटल्स संघाची तिसरी विकेट पडली, यश धुल 1 धावा करून बाद

दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ सध्या पराभवाच्या वाटेवर आहेत. हा सामना जिंकणे दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ सध्या पराभवाच्या वाटेवर आहेत. हा सामना जिंकणे दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 174 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावांची झंझावाती खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 175 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. यश धुल 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्कोअर 2/3.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement