DC Beat CSK, IPL 2024 Match 13: दिल्ली कॅपिटल्सने विजयाची चव चाखली, चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी केला पराभव

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 45 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले.

DC Beat CSK, IPL 2024 Match 13: दिल्ली कॅपिटल्सने विजयाची चव चाखली, चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी केला पराभव

DC vs CSK, IPL 2024, Match 13: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, दिल्लीने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीने चन्नईला 192 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीसाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 45 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 11:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).