Video: सनरायझर्स हैदराबादवर रोमहर्षक विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडूंनी दाखवला जोश, व्हिडिओमध्ये पहा काय म्हणाले

आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 धावांनी पराभव करून या मोसमातील आपला दुसरा विजय नोंदवला. हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या या (SRH vs DC) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 9 गडी गमावत 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघ 6 विकेट गमावून केवळ 137 धावाच करू शकला. पाच सामन्यांत सलग पराभव स्वीकारल्यानंतर दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे. त्याचवेळी या रोमांचक विजयानंतर दिल्ली संघात उत्साहाचे वातावरण होते. संघातील सर्व खेळाडू 'हाऊ इज द जोश'च्या घोषणा देताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now