DC vs RR IPL 2024 Live Score Update: दिल्ली कॅपिटल्सचे राजस्थान रॉयल्ससमोर 222 धावांचे आव्हान, फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची तुफानी फटकेबाजी
दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा जोडल्या. ज्यामध्ये ट्रेंट बोल्ट 1, संदीप शर्मा 1, रविचंद्रन अश्विन 3, युजवेंद्र चहलने राजस्थानकडून 1 बळी मिळवला.
दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 222 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्क (50), अभिषेक पोरेल (65), ट्रिस्टन स्टब्स (41) यांनी तुफानी खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 मधील 56 क्रमांकाचा सामना 6 मे (सोमवार) रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, फॉर्ममध्ये झगडत असलेल्या ध्रुव जुरेल आणि हेटमायर यांना राजस्थानने वगळले. दुबे आणि डोनोवन फरेरा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर इशांत शर्मा आणि गुलबदिन नायब दिल्लीसाठी संघात परतले आहेत. त्यामुळे आज गुलबदिन नायब आणि डोनोव्हान फरेरा या दोन परदेशी आयपीएल पदार्पणवीर आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा जोडल्या. ज्यामध्ये ट्रेंट बोल्ट 1, संदीप शर्मा 1, रविचंद्रन अश्विन 3, युजवेंद्र चहलने राजस्थानकडून 1 बळी मिळवला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)