Delhi Beat Bangalore: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात विकेट्सने केला पराभव, फिलिप सॉल्ट आणि रिले रोसोव यांची विजयी खेळी
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 50 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 181 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीवीर विराट कोहलीने सर्वाधिक 55 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने 16.4 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर फिलिप सॉल्टने सर्वाधिक 87 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कर्ण शर्मा, जोश हेझलवूड आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)