DC vs RCB, IPL 2024 Live Streaming: प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्ली-बंगळुरू यांच्यांत होणार चुरशीची लढत, एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह

दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दिल्ली 12 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत.

DC vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात (IPL 2024) रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (DC vs RCB) होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दिल्ली 12 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. संघ अजूनही शेवटच्या 4 च्या शर्यतीत आहे, पण आणखी एक पराभव आरसीबीला संपवू शकतो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement