DC Beat GT, IPL 2024 32nd Match Live Score Update: 6 विकेट राखत दिल्ली कॅपिटल्सने जिंकला सामना, गुजरात टायटन्सचा दारुण पराभव
दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने सर्वाधिक 20 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून संदीप वारियरने सर्वाधिक दोन बळी घेतले.
आयपीएलच्या आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सने दारूण पराभव केला. गुजरातला अवघ्या 89 धावांमध्ये रोखल्यानंतर दिल्लीचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यास मैदानात उतरला. अवघ्या 90 धावांचे आव्हान पार करताना दिल्लीने 4 गडी गमावलेत. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने चालू मोसमातील तिसरा विजय नोंदवला आहे. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 17.3 षटकांत केवळ 89 धावा करून अपयशी ठरला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 31 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने अवघ्या 8.5 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने सर्वाधिक 20 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून संदीप वारियरने सर्वाधिक दोन बळी घेतले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)