Sunrisers Hyderabad New Head Coach: डॅनियल व्हिटोरी बनले सनरायझर्स हैदराबादचे नवे मुख्य कोच, ब्रायन लाराची हकालपट्टी

सनरायझर्स हैदराबादने आज ट्विट करुन कोचिंग स्टाफमध्ये बदलाव केल्याची माहिती दिली

Daniel Vettori

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये खराब प्रदर्शनानंतर सनरायझर्स हैदराबादने (SRH) आपल्या संघात मोठा बदल केला आहे. काव्या मारनच्या या संघाने ब्रायन लाराला मुख्य प्रशिक्षकपदावरून काढून टाकले असून न्युझीलंडचा माजी कर्णधार डॅनिअल व्हिटोरीची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर नियुक्ती ही केली आहे. व्हिटोरी यापुर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे प्रशिक्षक होते. सनरायझर्स हैदराबादने आज ट्विट करुन कोचिंग स्टाफमध्ये बदलाव केल्याची माहिती दिली.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)