CWC 23 Team of the Tournament: टीम ऑफ टुर्नामेंट चा कर्णधार Rohit Sharma; ICC च्या सर्वोत्तम 12 मध्ये 6 भारतीय!

12 जणांच्या या टीम मध्ये विराट कोहली, के एल राहुल, मोहम्मद शामी, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, रोहित शर्मा या सहा भारतीयांचा समावेश आहे

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

भारताने यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप उंचावला नसला तरीही संपूर्ण स्पर्धेतील त्यांचा दबदबा वाखाण्याजोगा होता. नुकत्याच जाहीर झालेल्या टीम ऑफ टुर्नामेंट मध्येही हा दबदबा दिसून येत आहे. या टीम ऑफ टुर्नामेंट चं कर्णधार पद रोहित शर्मा कडे देण्यात आलं आहे. 12 जणांच्या या टीम मध्ये विराट कोहली, के एल राहुल, मोहम्मद शामी, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह या सहा भारतीयांचा समावेश आहे तर उर्वरित सहा मध्ये साऊथ आफ्रिकेचे Quinton de Kock आणि Gerald Coetzee हे दोन खेळाडू आहेत. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा Adam Zampa, Glenn Maxwell , श्रीलंकेचा Dilshan Madushanka आणि न्यूझिलंडच्या Daryl Mitchell याचा समावेश आहे.  IND VS ASU ICC World Cup Final: टीम भारतने चाहत्यांचे मानले आभार.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement