CSK vs DC IPL 2021: चेन्नईच्या Suresh Raina ने आयपीएल 14 सीजनची केली दणक्यात सुरुवात, 39व्या अर्धशतकाने केले विराट-रोहितची बरोबरी
या अर्धशतकासह आरसीबी कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली.
CSK vs DC IPL 2021 Match 2: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kins) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या सामन्यात सीएसकेचा (CSK) अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएल करिअरमधील 39वे अर्धशतक ठोकले व 14व्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली. रैनाने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत अर्धशतकी धावसंख्या गाठली. विशेष म्हणजे रैनाने आपल्या या अर्धशतकासह आरसीबी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) बरोबरी केली. विराट आणि रोहितने देखील आयपीएलमध्ये आजवर प्रत्येकी 39 अर्धशतक केली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)