Rishab Pant Accident: क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी, घरी परतत असताना कारची रेलिंगला धडक
तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.
Rishab Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला. ऋषभला देहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)