Rishab Pant Accident: क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी, घरी परतत असताना कारची रेलिंगला धडक

ऋषभला देहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

Rishab Pant Accident: क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी, घरी परतत असताना कारची रेलिंगला धडक
Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

Rishab Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला. ऋषभला देहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 09:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).