Team India Victory Parade: मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी गर्दीतून ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी तयार केला रस्ता, व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी खेळाडू विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे मार्गस्थ झाले आहेत.

Team India Victory Parade: मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी गर्दीतून ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी तयार केला रस्ता, व्हिडिओ होतोय व्हायरल

Team India Victory Parade: टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दिल्लीहून मुंबईत पोहोचला आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी खेळाडू विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे मार्गस्थ झाले आहेत. मरीन ड्राईव्हवर खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र आले आहेत. मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी गर्दीतून ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी रस्ता  तयार करुन दिला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2024 07:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).