Corona In IPL: दिल्लीच्या संघात दुसऱ्यांदा कोरोनाचा प्रवेश, चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी एका खेळाडूचा अहवाल पॉझिटिव्ह
रविवारी सकाळी सर्व खेळाडूंची चाचणी घेण्यात आली असून त्यांना त्यांच्या खोलीत राहण्यास सांगण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल.
IPL 2022 मध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. यावेळीही दिल्लीतील एका खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याबाबत साशंकता आहे. दिल्लीच्या संघाला आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 11 वा सामना खेळायचा आहे, मात्र संपूर्ण संघ आयसोलेशनमध्ये असल्याने या सामन्याबाबत साशंकता आहे. रविवारी सकाळी सर्व खेळाडूंची चाचणी घेण्यात आली असून त्यांना त्यांच्या खोलीत राहण्यास सांगण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)