CSK vs DC, IPL 2023 Toss Update: चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामातील 55 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज 6 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स फक्त 4 विजय मिळवून गुणतालिकेत तळाशी म्हणजे 10 व्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश थिकशाना.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिले रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, इशांत शर्मा.
Match 55. Chennai Super Kings won the toss and elected to bat. https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

