Matheesha Pathirana hamstring injury: आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात (IPL 2024) आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी (CSK vs PBKS) होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यासाठी श्रीलंकेत परतला आहे. याआधी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान राष्ट्रीय कर्तव्यासाठी बांगलादेशला परतला होता. संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरलाही दुखापत झाली आहे. 3 वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे सीएसकेच्या अडचणी वाढल्या आहेत. आज शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांच्यासोबत संघाने मैदानात उतरले आहे.
🦁🚨 OFFICIAL ANNOUNCEMENT 🦁🚨 #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
