CSK vs RR, IPL 2023 Live Score Update: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे.
आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. जर राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला तर ते पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवेल. त्याचबरोबर धोनीच्या संघालाही विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), सिसांडा मगला, महेश टेकशाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
Match 17. Chennai Super Kings won the toss and elected to field. https://t.co/MCaswAS0nK #TATAIPL #CSKvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

