Chennai Beat Rajasthan: चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून केला पराभव, प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा ठेवल्या कायम
आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 61 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (CSK vs RR) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह चेन्नईने प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत.
CSK vs RR, IPL 2024 61th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 61 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (CSK vs RR) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह चेन्नईने प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत. तत्तपुर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 142 धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थान रॉयल्ससाठी रियान परागने नाबाद 47 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. चेन्नई सुपर किंग्जकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 18.2 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर रुतुराज गायकवाडने सर्वाधिक 42 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून आर अश्विनने सर्वाधिक दोन बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)